बेळगाव : चलवेनहट्टी येथील ब्रम्हलिंग देवस्थानच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे आयोजन उत्साहात करण्याचा निर्णय मंदिर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला असून रविवारी दि. ४ मे रोजी रात्री ब्रम्हलिंग भजनी मंडळ चलवेनहट्टी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. ५ मे रोजी सकाळी ७.०० वाजता देवाला अभिषेक घालण्यात तसेच सकाळी सात ते अकरा या वेळेत स्वराली संगीत कलामंच चलवेनहट्टी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम येणार आहे. त्यानंतर राजा पंढरीचा महिला हरिपाठ चलवेनहट्टी यांचा हरिपाठचा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तसेच दुपारी १२ वाजता महाप्रसादाला सुरूवात होणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी संगीत भजनाच्या कार्यक्रमासह अभिषेक तसेच महाप्रसादचा लाभा घ्यावा, असे आवाहन ब्रम्हलिंग देवस्थान कमिटीने केले आहे.
February 14, 2026
बेळगाव / प्रतिनिधी राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत दावणगेरेच्या मंजुनाथने उत्कृष्ट सादरीकरण करत ‘मिस्टर कर्नाटक क्लासिक २०२६’ हा मानाचा किताब पटकावला. कडवी स्पर्धा, तगडे प्रतिस्पर्धी आणि रंगतदार पोझिंग […]








