विजयपूर / दिपक शिंत्रे

ऑपरेशन सिंधूर नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः काल रात्रीपासून तणावपूर्ण वातावरण आहे. अशा संवेदनशील वेळी पाकिस्तानच्या बाजूने सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थिनीविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे.

विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील तोरवी गावातील अल अमीन मेडिकल कॉलेज येथील वैद्यकीय विद्यार्थिनी तशावुद्द फारुकी शेख हिच्यावर पोलिसांनी स्वतःहून (सुमोटो) गुन्हा दाखल केला आहे. संबंधित विद्यार्थिनीने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर hoodyyyyyyy या नावाने पाकिस्तानच्या बाजूने पोस्ट टाकली होती. पोस्टमध्ये तिने लिहिले होते:
“*To my Pakistani Friends, People of IOJK, AJK. Avoid going near military, Govt Installation. If you are living close to 200KM border Radius. Please move Inland. May Allah protect us all from India, Ameen*” या पोस्टसोबत पाकिस्तानचा झेंडा देखील होता.

विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) विनोद दोडमनी यांना ही पोस्ट फेसबुकवर “वीरू किच्छ इन कर्नाटका” या व्यक्तीने शेअर केलेल्या माहितीतून आढळून आली. त्यात ‘विजयपूरमध्ये पाकिस्तानप्रेमी आहेत’ असे नमूद केले होते. ही माहिती पाहून PSI दोडमनी यांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला.

तिच्यावर BSN 152 197 3(5) 9.60 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने ती पोस्ट डिलीट करून माफी मागितली आहे.