- टीम इंडियाला मोठा धक्का
क्रीडा : टीम इंडियाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्माने टी – 20 नंतर कसोटी क्रिकेटमधूनही तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती सर्वांना दिली. भारतीय संघ आयपीएलनंतर पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. पण त्याआधीच रोहित शर्माने निवृत्ती जाहीर करत टीम इंडियासह क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर कसोटी क्रिकेटच्या डेब्यू कॅपचा फोटो पोस्ट करत हॅलो, मला सर्वांना हे सांगायचे आहे की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये देशाचे नेतृत्त्व करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मला इतकी वर्ष खूप प्रेम आणि कायम पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे खूप आभार. मी वनडे क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे कॅप्शन लिहिले आहे.
रोहितने निवृत्ती जाहीर करण्याआधी त्याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्याची चर्चा सुरु होती. रोहितने या दरम्यानच निवृत्त होत असल्याचा बॉम्ब टाकला आणि विषय संपवला.