बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील कॅम्प पोलिस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल मल्लसरजा अंकलगी (४५) यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शनिवारी रात्री ड्युटी संपवून जेवल्यानंतर ते नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी गेले होते. रविवारी सकाळी उशिरा कुटुंबीय त्यांना उठवण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. मल्लसरजा हे कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते आणि सर्व कर्मचाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. शहर पोलिस आयुक्त ईडा मार्टिन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त केला आहे.