उत्तरप्रदेश : येथील लखनऊच्या कल्ली पश्चिममध्ये एका खाजगी स्लीपर बसला भीषण आग लागली आहे. ही बस ६० प्रवांशाना घेऊन बिहारहून दिल्लीला निघाली होती. यामधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुलांची समावेश आहे. वृत्तानुसार, ही बस बिहारहून दिल्लीला निघाली असता सकाळी ५ वाजता मोहनलालगंजजवळ बाह्य रिंग रोडवर जे किसान पथ म्हणून ओळखले जाते. येथे ही घटना घडली. अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी झोपेत असल्याचे माहिती आहे. प्रवाशांनी सांगितले की, चालत्या बसमध्ये अचानक धुराचे लोट येऊ लागले, ज्यामुळे घबराट पसरली होती. काही मिनिटांतच आगीच्या जोरदार झळा बसू लागल्या. पण बस चालक आणि कंडक्टर बस सोडून पळून गेले. ड्रायव्हरच्या सीटजवळ एक अतिरिक्त सीट असल्याने प्रवाशांना खाली उतरण्यास अडथळा आला. ज्यामुळे घाईघाईत उतरताना अनेक प्रवासी अडकले आणि पडले. परिसरातील लोकांनी तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन दलाला ही माहिती दिली आहे.