बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स व बेळगावी डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्सच्या वतीने मंगळवार सायंकाळी बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची पोलीस मुख्यालयात सदिच्छा भेट घेण्यात आली. संघटनेचे सचिव राजेश लोहार यांनी त्यांचा व्यायामपटू व संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष अनिल अंबरोळे यांनी पोलिस आयुक्तांना सुवर्णपदक विजेते विनोद मेत्री व आंतरराष्ट्रीय पंच राजेश लोहार यांच्याबद्दल माहिती दिली. बेळगाव हे शरीर सौष्ठव क्षेत्रामध्ये तसेच व्यायामपटूबद्दल किती अग्रेसर आहे, ही माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे पोलिस आयुक्तांना येत्या काळात होणाऱ्या शरीर सौष्ठव स्पर्ध्येसाठी आमंत्रण देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे खजिनदार नारायण चौगुले, उपाध्यक्ष बाबू पावशे, सुनील बोकडे, सुनील चौधरी उपस्थित होते.