बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने इतर अल्पसंख्यांक समाजांना डावलून सरकारी कंत्राटामध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण दिल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी तीव्र आंदोलन छेडण्यात आले.बेळगाव शहर, ग्रामीण आणि जिल्हा शाखेतर्फे शहरात तीव्र आंदोलन छेडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन करण्याबरोबरच मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. कर्नाटक सरकारच्या सरकारी कंत्राटामध्ये मुस्लिमाना ४ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर राज्यात वादंग निर्माण झाला आहे.
त्याचे पडसाद राज्यभर उमटले पायदळी तुडवून ते पेटवून आहेत. या आंदोलनात शहर व देण्याद्वारे आपला संताप व्यक्त ग्रामीणसह जिल्ह्यातील भाजप केला. त्याचप्रमाणे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सिद्धरामय्या यांच्या प्रतिमेचे हातात निषेधाचे फलक घेऊन देखील दहन करून संताप व्यक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले केला गेला. याखेरीज कांही होते. यावेळी राज्यातील काँग्रेस भाजप कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सरकारच्या विरोधात जोरदार सर्कल येथे उभारण्यात आलेला निदर्शने करण्याबरोबरच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या बॅनर देखील फाडून टाकला. नावाचे घोषणा फलक यावेळी पोलिसांनी त्यांना आडकाठी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे उभयता वादावादीचा प्रसंग उद्भवला होता. यावेळी पोलीस जीपला घेराव घालत भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. भाजपच्या आंदोलनामुळे चन्नम्मा सर्कल येथील वाहतूक कांही काळ विस्कळीत झाली होती. या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भाजप नेते एम. बी. जिरली, माजी आ. संजय पाटील, माजी आ. अरविंद पाटील, शंकरगौडा पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.