बेळगाव : शेतकऱ्यांच्या जीवनातील एक घटक व जीवापाड प्रेम करतो ती त्यांची जीवनदाहिनी म्हणजे “म्हैस” पळवण्याच्या शर्यतीचे आयोजन करत असतो. यावर्षी देखील श्री शिवशक्ती युवा संघटना यांच्यावतीने होळी निमित्त भव्य म्हैस पळविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उद्या रविवारी १६ मार्च रोजी ही स्पर्धा पार पडणार असून या स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार संजय पाटील व माजी जिल्हा पंचायत आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष मोहन मोरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी म.ए. समिती नेते आर.एम. चौगुले, सिद्धाप्पा कांबळे, मथुरा तेरसे, रामचंद्र मन्नोळकर, गोविंद टक्केकर, सोनाली सरनोबत यासह आदी नेते मंडळी उपस्थिती राहणार आहेत.