चंदगड / लक्ष्मण यादव
चंदगड तालुका भाजपच्यावतीने चंदगड विधानसभा मतदार संघातील नुल व नेसरी मंडल अध्यक्षपदांसाठी नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये नुल मंडलासाठी अरुण मोकाशी तर नेसरी मंडलासाठी विजय पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. नुल मंडलासाठी चंद्रशेखर पाटील यांनी अरुण मोकाशी यांचे नाव सुचविले त्याला मार्तंड जरळी यांनी अनुमोदन दिले. तर नेसरी मंडलासाठी विजय गणपती पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून सुधीर कुंभार व विठ्ठल पाटील यांनी काम पाहिले.
निवड जाहीर होताच अनिल शिवनगेकर, अनिता चौगुले, चंद्रशेखर पाटील, मार्तंड जरळी, संतोष तेली यांनी मनोगत व्यक्त करून दोन्ही मंडल अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.

यानंतर नुल मंडल अध्यक्ष अरुण मोकाशी यांनी मनोगत व्यक्त करताना, सर्वसामान्य जनतेसाठी या पदाचा उपयोग करण्याची ग्वाही दिली. मंडलातील सर्व बुथप्रमुख, शक्ती प्रमुख व प्रमुख नेत्यांनी माझ्या पाठीशी राहून मला आशीर्वाद द्यावा व माझ्या कामाला मनापासून शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले. तर आणि नेसरी मंडल अध्यक्ष विजय पाटील यांनी आमदार शिवाजीराव पाटील व पक्षश्रेष्ठींनी दर्शविलेला विश्वास मी सार्थक करेन,असे सांगितले.
यावेळी आय. एस. पाटील, अनिता चौगुले, मार्तंड जरळी, योगिता संगाज, संतोष तेली, चंद्रशेखर पाटील, बसवराज कंकणवाडी, सुभाष चोथे, माधव पोटे पाटील, अनिल शिवनगेकर, अशोक गडदे आदी मान्यवर तसेच गडहिंग्लज तालुक्यातील सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख प्रमुख उपस्थित होते.