- काँग्रेसच्या मेळाव्यात घुसून भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचा गोंधळ
- पोलिसांनी घेतले ताब्यात
बेळगाव / प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी सीपीएड मैदानावर आंदोलन सुरु केले होते. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या भाषण देत असताना, अधिवेशनात आलेल्या भाजप महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी केली आणि गोंधळ घातला. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. काँग्रेसने भाजपला लक्ष्य बनवून या आंदोलनाचे आयोजन केले आहे. मात्र राज्यातील संपूर्ण कारभार आणि कायदा सुव्यवस्था ढासळत चाललेली आहे. याबाबत राज्य सरकारने लक्ष्य द्यावे अशी मागणी महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचा निषेद नोंदविण्यात आला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह मंत्री आणि आमदार यामुळे गोंधळले आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फटकारले. तसेच महिला भाजप कार्यकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यासंघर्ष करावा . जेव्हा भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वाहनातून नेले जात होते, तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनाला घेराव घातला, ते थांबले आणि पुन्हा वाद वाढला. पोलिसांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला आणि त्यांना तेथून बाहेर नेले.