बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, बंगळूरुच्या सूचनेनुसार, यावर्षी बेळगावात पीओपी आणि पर्यावरणाला हा पोहोचवणारे रंग वापरून तयार केलेल्या गणेश मूर्तींच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा बेळगाव महानगरपालिकेने दिला आहे.
कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, बंगळूरुच्या निर्देशानुसार, पीओपीपासून बनवलेल्या आणि रंग लावलेल्या मूर्ती तयार करण्यावर तसेच नदी , कालवे आणि विहीरी यांसारख्या जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे, यावर्षीच्या गणेशोत्सवात मूर्ती उत्पादक, नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांना बेळगाव महानगरपालिकेने आवाहन केले आहे. जर नियमांचे उल्लंघन झाले, तर पीओपी मूर्ती जप्त करून कारवाई केली जाईल, असा आदेश बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जारी केला आहे.