- एकाचवेळी तीन ठिकाणी छापे
बेळगाव / प्रतिनिधी
भ्रष्ट अधिकाऱ्यांना धक्का देत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास बेळगाव जिल्ह्यात छापे घातले. लोकायुक्त एसपी हणमंतराय यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव विभाग लोकायुक्तांच्या अखत्यारीतील तीन ठिकाणी एकाचवेळी केलेल्या या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.

या छापेमारी दरम्यान बेळगाव येथील देवराज अरस विकास महामंडळाचे व्यवस्थापक सिद्धलिंगप्पा यांचे घर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले. यामध्ये विद्यानगर येथील त्यांचे निवासस्थान आणि रायबाग तालुक्याच्या बेक्केरी गावातील घर आणि कार्यालयांवर छापा टाकून अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली.

याशिवाय धारवाड पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता एच.सी.सुरेश यांच्या बेळगाव हनुमाननगर येथील निवासस्थानी छापा टाकण्यात आला आणि महत्त्वाची कागदपत्रे तपासण्यात आली. त्याचप्रमाणे, लोकायुक्तांनी गदग येथील निर्मिती केंद्राचे प्रकल्प संचालक गंगाधर यांच्या घरावरही छापा टाकून त्यांच्या मालमत्तेशी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी केली आहे.