बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. बेळगावातील एका ७२ वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रुग्णावर बेळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तपासणी दरम्यान कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती डीएचओ डॉ. ईश्वर गडादी यांनी माध्यमांना दिली. दक्षिण भारतातून सुरू झालेला हा संसर्ग आता दिल्ली आणि उत्तर भारताकडे सरकत आहे. एका आठवड्यात दिल्लीत ९९ आणि गुजरातमध्ये ८३ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. केरळमध्ये सर्वाधिक ४३० सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील ६९ नवीन रुग्णांपैकी ३७ रुग्ण मुंबईत आहेत, तर कर्नाटकात ४७ रुग्ण आढळले आहेत आणि एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.