- खासदार जगदीश शेट्टर यांच्या सूचना
- रेल्वे ,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि विमानतळ अधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
लोकसभा सदस्य आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. जगदीश शेट्टर यांनी आज जिल्हाधिकारी रोशन मोहम्मद यांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित केली होती.या बैठकीत बेळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, दक्षिण पश्चिम रेल्वे विभाग आणि नागरी विमान वाहतूक विभाग यासारख्या केंद्र सरकारच्या विभागांनी हाती घेतलेल्या विविध विकासकामांच्या अंमलबजावणीची प्रगती माहिती घेण्यात आली.
खासदार शेट्टर यांनी, बेळगाव शहरातील रिंगरोड/बायपासच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. होनगा-झाडशहापूर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या मार्गावरील सर्व भूसंपादनाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.त्याचप्रमाणे हलगा ते मच्छे दरम्यान ९ किमी लांबीचे रस्ते बांधकाम देखील निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
बेळगाव (शेगुणमट्टी) – हुणगुंद – रायचूर मार्गावर बांधण्यात येणाऱ्या ४३ किमी रस्त्याच्या बांधकामापूर्वी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या कामाची माहिती घेतली. भूसंपादनाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून काम सुलभ करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत बेळगाव शहरातील हॉटेल संकम मार्गावर उड्डाणपूल बांधण्याबाबतही चर्चा झाली. कोणतेही काम सुरू झाल्यानंतर ते सातत्याने आणि पूर्ण करून जनतेच्या सोयीसाठी असेल याची खात्री करावी, असे खासदारांनी सुचवले.
बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वे मार्गासाठी,महसूल विभागाच्या प्रधान सचिवांशी आणि पायाभूत सुविधा विभागाच्या प्रधान सचिवांशी चर्चा केली आणि त्यांना बैठकीत भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेण्याचे आणि शेतकऱ्यांना कोणतीही गैरसोय न होता, जमीन देणाऱ्यांना सरकारकडून भरपाईचे वाटप लवकरात लवकर करण्याच्या मुद्द्यावर विचार करण्याचे आवाहन केले.
या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प संचालक श्री भुवनेश कुमार, बेळगाव विमानतळ संचालक श्री त्यागराजन, भूसंपादन अधिकारी श्री चौहान, श्री. नारायण राणे, राजश्री जैनापुरा, नैऋत्य विभागाचे रेल्वे अभियंता श्री निसामुद्दीन आणि इतर अधिकारी उपस्थित होते.