- चालू आर्थिक वर्षापासून वाढीव बोजा
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील मिळकतीच्या घरपट्टीत अखेर तीन टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे बेळगावकरांना चालू आर्थिक वर्षापासून वाढीव घरपट्टीचा बोजा सहन करावा लागणार आहे. घरपट्टी वाढीच्या निर्णयावरून महापालिकेत तब्बल तासभर चर्चेचे गुरळ रंगले होते. अखेर सर्वानुमते चर्चा करून घरपट्टी वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्याच्या घरपट्टीत तीन ते पाच टक्के पर्यंत वाढ करण्यात यावी असा आदेश सरकारने बजावला आहे. यामुळे २४ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या अर्थात काही समित्या बैठकीत चार टक्के घरपट्टी वाढीचा निर्णय घेण्यात आला होता.दरम्यान या वाढीव घरपट्टीला बहुतांश नगरसेवकांनी विरोध केला होता.