• भूषण बोरसे नूतन आयुक्त…!

बेळगाव / प्रतिनिधी

पोलिस विभागात मोठे फेरबदल करण्यात आले असून बेळगाव, मंगळूर आणि उडुपी जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत.

यामध्ये बेळगाव शहर पोलीस आयुक्तपदी असलेले ईडा मार्टिन यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी २००९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी भूषण गुलबाराव बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान ईदा मार्टिन यांना कोणतेही पद न देता बदली करण्यात आली आहे.