- केएलईजवळ होर्डिंग कोसळले
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात मंगळवारी सायंकाळपासून अचानक आलेल्या जोरदार वळीव पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्याच्या वेगामुळे शहरातील नेहरूनगर परिसरातील केएलई हॉस्पिटलच्या बाजूला असलेले एक मोठे जाहिरात होर्डिंग कोसळले.

सकाळपासूनच बेळगावात ढगाळ वातावरण होते आणि सायंकाळच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. नेहरूनगरमध्ये केएलई हॉस्पिटलनजीक असलेले एक मोठे होर्डिंग जोरदार वाऱ्यामुळे फुटपाथवर पडले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु फुटपाथवर पडलेल्या होर्डिंगमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.