बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 17 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. यासंबंधीची नोटीस कौन्सिल विभागाच्या वतीने सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांना जारी करण्यात आलेली आहे. सकाळी 11 वाजता महापालिकेतील मुख्य सभागृहात ही बैठक होणार आहे. बैठकीत अर्थ व कर आरोग्य बांधकाम व लेखास्थायी समिती बैठकांमध्ये झालेल्या ठरावांचे वाचन करून त्यांना मंजुरी दिली जाणार आहे. कंत्राटी पद्धतीवर कायदा अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे.के आयएडीबी रस्ता, प्रभाग क्रमांक 34 मध्ये येणाऱ्या शाहुनगर येथील मिळकतींना कंग्राळी बी के कडून बांधकाम परवाना. देण्यासह कर वसूल केला जात आहे. या विषयावर वर बैठकीत चर्चा केली जाईल.

डॉक्टर बी आर आंबेडकर उद्यानात, भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या अष्टधातू नवीन पुतळा उभारण्या संदर्भात केली चर्चा केली जाणार आहे.प्रभाग क्रमांक सात मध्ये नियमांचे उल्लंघन करून बांधकामे करण्यात आली आहेत. या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. मागच्या बैठकीतील इतर सहा विषयांवर सर्वसाधारण सभेत चर्चा केली जाणार आहे.