• लाखोंचे नुकसान

बेळगाव / प्रतिनिधी

शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. झेंडा चौक कांदा मार्केट येथील दिलीप कलघटगी मालकीचे व सध्या भाडोत्री असलेले चिरमुरे दुकान आणि प्लास्टिक स्टेशनरी दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. जवळपास पाच तासाहून अधिक वेळ ही आग पेटत होती. फायर ब्रिगेडच्या ६ हून अधिक बंबानी आग विझवण्यासाठी कर्मचारी झटत होते. फायर ब्रिगेड प्रमुख शिवाजी कोरवी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठ वाजता आग आटोक्यात आणण्यात आली.आग विझवण्यासाठी झेंडा चौकातील व्यापारी प्रदीप सिद्धनावर, मोतीचंद्र दोरकाडी, अमित किल्लेकर ,यांनी विशेष मदत केली.स्टेशनरी दुकानात अंदाजे वीस लाखाहून अधिक माल होता. अशी माहिती देताना दुकानाचे मालक विक्रम सिंग यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.