बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या सांबरा विमानतळावरून स्टारएअर या महिन्यापासून दोन नवीन प्रादेशिक मार्ग सुरू करत आहे. सध्या सुरू असलेल्या मार्गाचे अपग्रेड केले जाणार आहे. या उपक्रमांचा उद्देश प्रादेशिक संपर्क वाढवणे आणि प्रवाशांना अधिक सेवा देणे आहे.
स्टार एअर २० मे पासून बेळगाव हैद्राबाद बेळगाव मार्गावर उड्डाणसेवा सुरू करणार आहे. ही सेवा आठवड्यातून दोनदा मंगळवार आणि बुधवारी असेल. बेळगावहून सकाळी ८ वाजता निघणारे विमान सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी हैद्राबादला पोहोचेल. हैद्राबादहून सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी निघणारे विमान संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी बेळगावला पोहोचेल.
त्याचबरोबर स्टारएअरने १ मे पासून बेंगळूर आणि बेळगाव दरम्यान आठवड्यातून तीनवेळा सोमवार , गुरुवार आणि रविवार या दिवशी विमानसेवा सुरू केली आहे.