- शेतकरी हतबल
बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात असणाऱ्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बेकिनकेरे परिसरात गेल्या वीस दिवसांपासून हत्तीने धुमाकूळ घातला आहे. आता या भागात गव्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वनविभागाकडून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.