विजयपूर / दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्ह्याच्या इंडी तालुक्यातील सालोटगी रस्त्यावर, पोलिसांनी गोपनीय माहितीनुसार छापा टाकून बेकायदेशीररीत्या शिधा धान्य (अन्नधान्य) साठवून वाहतूक करत असलेल्या चौघांना अटक करून शिधा धान्य जप्त केले आहे.
मुजामील मकानदार, शिराज तांबोळी, गालिब मिट्टे आणि गणू देवकत्ते अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून २७,२६० रुपयांचे ९ क्विंटल ४० किलो शिधा धान्य जप्त करण्यात आले असून, हे अन्नधान्य अंदाजे एक लाख रुपये किंमतीच्या प्रवासी वाहून नेले जात होते. पोलिसांनी धान्य आणि वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी इंडी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.