विजयपूर / दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार शिवानंद पाटील यांनी भाजप मधून निलंबित करण्यात आलेले विजयपूर शहर आमदार बसवनगौडा पाटील यांचे आव्हान स्वीकारून आपल्या आमदार पदाचा राजीनामा सभापतींकडे सादर केला आहे.
त्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, शहर आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांनी त्यांच्या आमदार पदाचा राजीनामा दिल्यानंतर माझ्या राजीनामा स्वीकारण्यात यावा असे म्हटले आहे. विजयपूर शहर अथवा बसवनबागेवाडी मतदारसंघातून बसवनगौडा पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास आपण सज्ज असलेल्या त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.