• लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

बेळगाव / प्रतिनिधी

बॅ. नाथ पै सर्कल शहापूर या ठिकाणी जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. या संदर्भात येथील नागरिकांनी तातडीने मनपा यंत्रणा तसेच एल अँड टी कंपनीला माहिती दिली होती. मात्र बऱ्याच उशिरापर्यंत पाणी वाया जात असूनही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त झाली. कडक उन्हाळ्याच्या परिस्थितीमुळे सध्या शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाचे आगमन होईपर्यंत शहराला काही ठिकाणी सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र अशा प्रकारे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असताना देखील यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून येत आहे. याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत होती.