अथणी / वार्ताहर

अथणी मार्गे सप्तसागरकडे जाणाऱ्या केएसआरटीसी परिवहन मंडळाच्या बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला. अथणी पोलीस स्थानकाच्या हद्दीत बुधवारी दुपारी ही घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, अथणी परिवहन मंडळाच्या बसला आज दुपारी सप्तसागर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हल्याळ नजीक अपघात झाला. अचानक बसचा ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच, चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगार्‍यावरून नेऊन आडव्या असलेल्या नारळाच्या झाडाला धडकवली. यामुळे बस पलटी न होता थांबली आणि सुदैवाने मोठा अपघात टळला.अन् ३६ प्रवाशांचा जीव वाचला. हा अपघात टाळल्याबद्दल स्थानिकांनी चालकाचे कौतुक केले.