रामनगर / प्रतिनिधी

जगलबेट कॅसलरॉक मार्गावरील असू नजीक कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. बोरेगाळी क्रॉस येथे कुरवय येथून निघालेली दुचाकी आणि गोवा येथून दांडेली नजीक फणसोली येथे जाणारी कार यांच्यात हा अपघात घडला. यामध्ये कामरा येथील रहिवासी बालकृष्ण बिसो गावडा (वय 75) हे अपघातात ठार झाले. ते आपल्या पत्नी समवेत दुचाकी क्रमांक वरून जात असता भरधाव वेगातील कारने जोराची धडक दिली . बाळकृष्ण गावडा हा गंभीर जखमी झाल्याने त्याला 108 रुग्णवाहिकेतून प्रथम रामनगर येथे प्राथमिक उपचार केले नंतर बेळगाव येथील खाजगी हॉस्पिटल नेत असता त्याचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी जखमी झाल्याने तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाली आहे.