- पांगुळ गल्ली येथे तणाव : पोलीस बंदोबस्तात वाढ
बेळगाव / प्रतिनिधी
पांगुळ गल्ली येथे श्री अश्वत्थामा मंदिरावर पुन्हा दगडफेक झाली आहे. सोमवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून महिन्याभरातील ही दुसरी घटना घडली आहे. दगडफेकीनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
सोमवारी मध्यरात्री एका तरुणाने मंदिरावर दगडफेक केली. ही गोष्ट स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्या तरुणाला पकडून त्याला मार्केट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दि. १८ मार्च रोजी रात्री याच मंदिरावर दगडफेक झाली होती. त्यावेळीही दगडफेक करणाऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. या घटनेला एक महिना पूर्ण झाला नाही तोच दुसऱ्यांदा दगडफेक झाली आहे. या घटनेनंतर पोलीस अधिकारी पांगुळ गल्लीत दाखल झाले आहेत. रात्री बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.