बेळगाव / प्रतिनिधी
जमीन वादातून आंबेवाडी, ता. बेळगाव येथे झालेल्या तुंबळ हाणामारीत आठ जण जखमी झाले आहेत. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रॉड व शस्त्रांचा हाणामारीत वापर झाल्याची माहिती मिळाली आहे. काही जणांच्या हातापायांना व एकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सर्व जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. भाऊबंदांच्या दोन गटात ही घटना घडली आहे. यल्लाप्पा राक्षे (वय 52), लक्ष्मी राक्षे (वय 40), लक्ष्मण राक्षे (वय 23), अर्चना राक्षे (वय 31), संजय राक्षे (वय 58), गोविंद राक्षे (वय 60), मारुती राक्षे (वय 29), सविता राक्षे (वय 50) सर्व राहणार आंबेवाडी अशी जखमींची नावे आहेत.