• कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती उघडकीस

विजयपूर / दिपक शिंत्रे

विजयपूर जिल्ह्यातील आंबेडकर निगमच्या जिल्हा व्यवस्थापिका रेनुका सातरले यांच्या घरी आज लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धाड टाकली असून, कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती उघडकीस आली आहे. सोने, चांदी, रोख रक्कम यासह ऐषआरामाच्या वस्तू सापडल्या आहेत. महाराष्ट्रात कोटींच्या अपार्टमेंटच्या बांधकामाची माहितीही तपास अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

यावेळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी घरात अनेक ठिकाणी नोटांचे बंडल सापडले. या रुपायांचे कोणतेही अधिकृत दस्तावेज उपलब्ध नव्हता त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर संपत्ती सापडली आहे. 250 ग्रॅम सोने (लॉकरमधील साठा वेगळा) दोन किलो चांदी , रोख रक्कम सुमारे ₹10 लाख (कोणतेही दस्तावेज उपलब्ध नाहीत) घड्याळे आणि सनग्लासेस 20 ते 50 हजार रुपये किमतीची 50 पेक्षा जास्त घड्याळे आणि सनग्लासेस सापडले मिळालेल्या माहिती आधारे रेनुका सातरले यांच्यावर घरावर ही धाड घालण्यात आली होती.

  • इतर राज्यांतील संपत्ती

फक्त इतकेच नाही, तर महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांचे अपार्टमेंट उभारले असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. विजयपूर शहरातसुद्धा इमारती आणि घरे रेनुका सातरले यांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर खरेदी करण्यात आल्याची माहितीही तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे.