बेळगाव / प्रतिनिधी
टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याच्यार केल्याप्रकरणी दुसऱ्या जिल्ह्यातील सीपीआयचा मुलगा अर्थात तिसरा आरोपी आणि रिसॉर्ट चालवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणी अटक केलेल्या एकूण आरोपींची संख्या आता पाच इतकी झाली आहे.
अलीकडेच अटक करण्यात आलेल्यांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सीपीआयचा अल्पवयीन मुलगा आणि ज्या रिसॉर्टमध्ये गुन्हा घडला होता तो चालवणारे रोहन पाटील आणि आशुतोष पाटील यांचा समावेश आहे. रोहन पाटील आणि आशुतोष पाटील यांना हिंडलगा तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तपासात असे दिसून आले आहे की त्यांनी दरमहा २०,००० दराने घर भाड्याने घेतले होते आणि ते रिसॉर्टमध्ये रूपांतरित केले होते. सीपीआय अधिकाऱ्याच्या मुलाला रिमांड होममध्ये ठेवण्यात आले आहे. बेळगाव मार्केट पोलिस स्टेशन हाताळत असलेल्या या प्रकरणामुळे जनतेत संताप व्यक्त होत आहे. ज्यात व्यापक चौकशी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.