बेळगाव / प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीशी मैत्री केल्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे शहर पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सांगितले.
ते रविवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पीडित मुलगी आणि आरोपी मूळचे बेळगाव जिल्ह्यातील आहेत. अल्पवयीन मुलीशी मैत्री करणाऱ्या एका आरोपीने तिला आमिष दाखवून काकतीजवळील टेकडीवर नेले आणि ६ जणांनी मिळवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. १५ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे. या प्रकरणासंदर्भात सहा आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
आरोप्यांनी अत्याचाराची घटनेचे चित्रीकरण केले. चित्रीकरण करून ब्लॅकमेल करण्यात आला आणि जानेवारीमध्ये तिन्ही आरोपींनी पुन्हा तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यांनी सांगितले की, या प्रकरणासंदर्भात ५ आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या एका आरोपीला अटक करण्यासाठी ते शोध मोहीम राबवत आहेत.
पाच आरोपींपैकी दोघे अल्पवयीन आहेत. हा गुन्हा मुख्य आरोपी ए१ आणि एर ने केला आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.