• चार राज्यांचे प्रतिनिधी होणार सहभागी

कोल्हापूर / प्रतिनिधी

कर्नाटक राज्याकडून आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येणार आहे.या प्रश्नी १८ जून रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्यासोबत बैठक होणार आहे.

यामध्ये महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांचे मंत्री आणि शासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. या बैठकीत धरणाची उंची, महापुराच्या काळात धरणातील पाणीसाठा, आंतरराज्य पाणी करार याबाबत चर्चा होणार आहे,अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. तेथे होणाऱ्या चर्चेनंतर पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित होणार आहे असे त्यांनी सांगितले आहे.