पंढरपूर : यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या दिवशी पहाटे मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते श्रींची शासकीय महापूजा केली जाणार आहे. यात्रेचा कालावधी २६ जून ते १० जुलै असा आहे.या यात्रा कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांना आत्ता आधुनिक व पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा रद्द करून देण्यात येणार आहेत. २७ जून पासून विठ्ठल रखुमाईचे २४ तास दर्शन उपलब्ध होणार आहे.
याशिवाय यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर जतन व संवर्धनाची सध्या सुरू असलेली सर्व कामे अंतिम टप्प्यात असून टोकन दर्शन प्रणालीची १५ जून रोजी पहिली चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती सहअध्यक्ष गहनिनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.