अंकली / प्रतिनिधी
अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा अशा या मानाच्या अश्वांच्या अंकली ते आळंदी अशा ३०० किलोमीटर प्रवासास सुरुवात झाली. येथील शितोळे घराण्याकडे १९३ वर्षांपासून माऊलीच्या अश्वाची परंपरा आहे. या गावचे शितोळे सरकार यांचे दोन मानाच्या अश्वांचे हिरा आणि मोती वारकऱ्यांसह आळंदीत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रविवारी सकाळी ११.०० च्या सुमारास प्रस्थान झाले. मानाचा जरीपटका अश्वांचे सारथ्य करणारे श्री तुकाराम कोळी यांनी श्री उर्जितसिंहराजे व श्री महादजीराजे शितोळे सरकार पिता-पुत्रां कडून स्विकारला. पुढील सुमारे ४५ दविस यांची मनोभावे जपणूक केली जाईल. याप्रसंगी सौ. मोहिनीराजे महादजी शितोळे तसेच सेनापती कापशीहून सरसेनापती संताजी घोरपडे वंशातील बारावे श्री राणोजीराजे घोरपडे हे हजर होते. अश्वांचे विधिवत पूजन आटोपून त्यांना टाळ-मृदंगाच्या तालात, विठूनाम व माऊलीच्या गजरात या अश्वदिंडीला असंख्य ग्रामस्थ व भक्तगण यांच्या साक्षीने नरोप देण्यात आला. अंकली गावातील श्री विठ्ठल रखुमाई तसेचं ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिरात आशिर्वाद घेऊन सुमारे २०० वारर्कयांसह ही पायी दिंडी मार्गस्थ झाली. दर टप्प्यांवर शेकडोंनी वारकरी या दिंडीत सामील होणार आहेत. ही अश्व सहभागी प्रथा इ.स. १८२० (सुमारे २०० वर्षे ) पासून सुरू असून. श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या वारीतील गोल रिंगण – पुरंदवडी, खुडुस फाटा, ठाकूरबुवांची समाधी, बाजीराव विहीर त उभे रिंगण – लोणंद, भंडी शेगाव व वाखरी, या ठिकाणी होते अखेरच्या टप्प्यात वाखरी येथे रिंगणाआधी सर्व दिंड्या एकत्र येतात.
मग एकचं जल्लोष…. प्रत्येकजण ह्या अश्वांची धूळभेट घेण्यासाठी सरसावतात व आषाढी एकादशीचा सोहळारंभ होतो बेळगावातून या सोहळ्यास नरोप देण्यासाठी सर्वश्री नितीन कपिलेश्वरकर, शिवराज पाटील, प्रभाकर हलगेकर, श्रीकांत विरगी, बापूसाहेब देसाई, नागेश मजूकर, व इतर सहभागी झाले.