बेळगाव : राजेश चौगुले फाउंडेशन, अंकलखोप या सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे बेळगावच्या आशा पत्रावळी यांना नारीशक्ती – २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्त्रीच्या जिद्द, संघर्ष, प्रेम, त्याग व निस्वार्थ सेवेचा, तेजस्वी वाटचालीचा गौरव करणारा हा सोहळा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी अंकलखोप येथे आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी सौ. पत्रावळी म्हणाल्या, “हा पुरस्कार मला नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा देतो. माझ्या यशामागे माझ्या कुटुंबाचे, मार्गदर्शकांचे आणि समाजातील प्रत्येक स्त्रीचे पाठबळ आहे.” त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन व्यक्त होत आहे.
आशा पत्रावळी यांनी साहित्य, लेखन, शिक्षण, कला, समाजसेवा, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी आजवर वीणकामाच्या क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळवले आहेत. त्यांनी विणकाम या विषयावर लिहिलेली सहा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.