- ग्रामीण कुली मजूर संघातर्फे जिल्हा पंचायत कार्यालयासमोर आंदोलन
बेळगाव / प्रतिनिधी
शासकीय नियमानुसार शंभर दिवस काम आणि पुरेसा भत्ता द्यावा, या मागणीसाठी कंग्राळी (बीके) येथील ग्रामीण कुली मजूर संघातर्फे सोमवारी बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
कंग्राळी (बीके) ग्रामपंचायतीकडे ५० दिवसांच्या कामासाठी अर्ज करूनही आम्हाला एनएमआर अंतर्गत काम दिले जात नाही. नरेगा कायद्यांतर्गत कोणतेही लाभ मिळत नाहीत. ६०% महिलांना रोजगाराची हमी असूनही नोकरी शोधावी लागते. बेरोजगारी भत्ताही दिला जात नाही.गरीब मजुरांना १०० दिवसांचे काम द्यावे अशी मागणी आंदोलक विश्वेश्वरय्या हिरेमठ यांनी केली.
आम्ही दुसऱ्या गावात कामाला जायला तयार आहोत. पण आम्हाला १०० दिवस काम द्यावे, अशी मागणी केली. गेल्या वेळीही पूर्ण १०० दिवस काम मिळाले नाही. मिळालेल्या कामाचा नियमानुसार भत्ता दिला जात नाही. कामगारांना स्वतः: शिधून काम घ्यावे लागते ही चुकीची परिस्थिती आहे, असे पद्मा बसरीकट्टी यांनी सांगितले.
या आंदोलनात कंग्राळी (बीके) येथील मजूर मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.