बेळगाव / प्रतिनिधी

८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंच बेळगाव (महाराष्ट्र राज्य मंच) यांच्यावतीने येत्या शुक्रवार दि. ३० मे २०२५ रोजी सकाळी १० : ३० वाजता राज्यस्तरीय वार्षिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमनाथ लॉन, बॉक्साईड रोड हिंडलगा, बेळगाव या ठिकाणी आयोजित या स्नेहमेळाव्याचे अध्यक्षपद बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले हे भूषवणार आहेत. याप्रसंगी उद्घाटक म्हणून चंदगड महाराष्ट्राचे आमदार शिवाजीराव पाटील आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून बेळगाव जिल्हा प्रमुख कस्टम अधिकारी आकाश चौगुले उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून, माजी आमदार मनोहर किणेकर, मध्यवर्ती म. ए. समिती बेळगावचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मराठी विद्यानिकेतनचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, म. ए. समिती बेळगावचे खजिनदार प्रकाश मरगाळे, हिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर आणि चंदगडचे माजी सभापती शांताराम पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होणार आहे.

याशिवाय डी. बी. पाटील, पीटर डिसोजा, दत्ताजी उघाडे, रवी तरळे, राजेंद्रकुमार चलवादी, बी. एम. चौगुले, राहुल जाधव, गणेश देसाई, रामचंद्र कुद्रेमणीकर, संतोष पाटील वगैरे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंचच्यावतीने आयोजित या वार्षिक स्नेह मेळाव्याप्रसंगी विशाल बेळगुंदकर, शोभा देसाई, कल्लाप्पा एकनेकर, गोपाळ चौगुले, मारुती पाटील, संजीत जाधव, सुरेश सावंत, शंकर ढेकोळकर, गणपती पाटील, सुनीता पाटील, विठ्ठल पाटील, उदय पाटील, दीपक मणगुतकर आणि अजय पाटील या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या व्यक्तींचा सत्कार केला जाणार आहे. याखेरीज नूतन संचालक कर्मचारी सोसायटी बेळगावचे सदस्य आणि आदर्श शिक्षकांचा देखील सत्कार केला जाणार आहे. राज्यस्तरीय वार्षिक स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून महिलावर्गासाठी हळदीकुंकू समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.